पाण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण; दिवसातून दोनवेळा पाण्याची मागणी

पाण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण; दिवसातून दोनवेळा पाण्याची मागणी

निफाड। प्रतिनिधी | Niphad

लासलगाव (lasalgaon), विंचूरसह (vinchur) 16 गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत (water supply scheme) गेल्या 35 दिवसांपासून टाकळी विंचूर साठी पाणी मिळालेले नाही. त्यामुळे किमान आठ ते दहा दिवसातून दोनदा पाणी देण्यात यावे अन्यथा

येथे टँकरने (tanker) पाणीपुरवठा (water supply) करावा या प्रमुख मागणीसाठी टाकळी विंचूर (Takli Vinchur) ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी काल मंगळवार दि.26 पासून निफाड पंचायत समितीसमोर (Niphad Panchayat Samiti) उपोषणास प्रारंभ केला असून जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न (water issue) सुटत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे निफाड पं.स. चे माजी सभापती शिवा सुरासे, ग्रामपंचायत सरपंच अश्विनी जाधव यांचेसह ग्रा.पं. पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे.

टाकळी विंचूर गावासाठी 16 गाव योजनेतून आठ दिवसातून पाण्याच्या टाक्या भरून द्याव्यात किंवा टँकरने (tanker) पाणीपुरवठा (water supply) करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने दि.14.4.2022 रोजी पं.स.चे गटविकास अधिकारी संदिप कराड (Group Development Officer Sandeep Karad) यांना निवेदन (memorandum) देण्यात आले होते. या निवेदनाची दखल न घेतल्यास पं.स. समोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला होता. परिणामी पं.स. प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्याने अखेरीस संतप्त झालेले ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी कालपासून पं.स. च्या आवारात उपोषणास प्रारंभ केला आहे.

यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने दिलेल्या निवेदनात (memorandum) म्हटले आहे की, लासलगाव (lasalgaon), विंचूरसह 16 गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे दहा दिवसातून टाकळीसाठी दोनदा पाणी देण्यात यावे तसेच या योजनेसाठी सरकारी अधिकारी नेमण्यात यावा. 16 गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होवू शकत नसेल तर टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली ती फक्त टाकळी गावाकरिताच का? आज रोजी 35 दिवस झाले असून अद्याप पाणी आलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत गावाचा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी घेतला असून निफाड पं.स. समोर पं.स. चे माजी सभापती शिवाजी सुरासे, ग्रा.पं. सरपंच अश्विनी जाधव, उपसरपंच ज्ञानेश्वर मोगल,

सदस्य केशव जाधव, संतोष राजोळे, हरिष गवळी, नाना राजगिरे, अनिल माळी, ज्योती सुरासे, पुनम आमले, ललिता पठाडे, निता अहिरे, संगिता पाचोरकर, वर्षा काळे, दीपाली लाड, संजय काळे, गणेश कापसे, रवींद्र पाचोरकर, भाऊराव काळे, विक्रम जाधव, नंदू कुर्‍हाडे, राम बोराडे आदींसह ग्रामस्थांनी उपोषणास सुरुवात केली आहे. या उपोषणप्रसंगी टाकळी विंचूर परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ देखील उपस्थित होते. टाकळी ग्रामस्थांच्या या उपोषणास काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सचिन होळकर, खेरवाडीचे शंकर संगमनेरे आदींनी पाठिंबा दिला आहे.

पाणीटंचाईची तीव्रता कमी करावी आमच्या गावात पाणीटंचाईची समस्य गंभीर बनली आहे. पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. आज 35 दिवस झाले 16 गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी आले नाही. त्यामुळे पाणी येत नसेल तर टँकरने पाणीपुरवठा करावा किंवा किमान आठ ते दहा दिवसातून आमच्या पाण्याच्या टाक्या भरून देत पाणीटंचाईची तीव्रता कमी करावी.

- अश्विनी जाधव, सरपंच टाकळी विंचूर

Related Stories

No stories found.