ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

शासनस्तरावरुन पिंपळगावला नगरपरिषदेचा दर्जा मिळावा यासाठी घोषित झालेल्या पिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीवर ( Pimpalgaon Basvant Grampanchayat Election ) बहिष्काराचे अस्त्र उपसण्याचा अभूतपूर्व निर्णय पिंपळगाव शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे. त्यासाठी सर्वपक्षीय समिती गठीत करण्यात आली आहे.

राज्यात सर्वाधिक 70 हजार लोकसंख्येची ग्रामपंचायत व राजकीय संवेदनशील असलेल्या पिंपळगावात महत्वाकांक्षी नेत्यांच्या राजकीय त्यागाच्या भूमिकेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. नगरपरिषदेत रूपांतर करण्याचा शासनस्तरावर प्रस्ताव प्रलंबित आहे. विकासकामाच्या दृष्टीने ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे. त्यासाठी महिन्याभरापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय सहविचार सभेत बहिष्काराचा निर्णय झाला. पिंपळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक दोन दिवसांपूर्वी जाहीर झाली अन् इच्छुकांच्या महत्वाकांक्षांंना धुमारे फुटले. दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणूक झाली तर दोन-तीन वर्षे नगरपरिषदेत रूपांतर होणार नाही हे ओळखून सतीश मोरे, बापूसाहेब पाटील यांनी पुन्हा प्रमुख नेत्यांची आज सहविचार सभा बोलवली.

त्यात आमदार दिलीप बनकर, माजी सरपंच भास्कर बनकर, भाजपचे मोरे, पाटील यासह बाळासाहेब आंबेकर यांनी गावच्या विकासासाठी राजकीय महत्वकांक्षा दूर ठेवून बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय घेतला. कुणी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला तर गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत त्या इच्छुकाला थांबविण्यात येणार आहे. सर्वपक्षीय व सामाजिक समतोल राखत समितीची निर्मिती करण्यात आली आहे. 2007 मध्ये असा समझोता होऊन बिनविरोध निवडणुकीचा चमत्कार घडला होता. पंधरा वर्षानंतर ऐतिहासिक निर्णय बहिष्काराच्या माध्यमातून होत आहे.

बहिष्कारासाठी गठीत करण्यात आलेली समिती : आमदार दिलीप बनकर, माजी सरपंच भास्कर बनकर, निसाकाचे माजी अध्यक्ष तानाजी बनकर, अशोक शाह, विश्वास मोरे, दिलीप मोरे, सोहनलाल भंडारी, सुरेश खोडे, सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, ग्रा.पं. सदस्य संजय मोरे, बाळासाहेब आंबेकर, पुंडलिक गायकवाड, मनसेचे संजय मोरे, योगेश गांगुर्डे, संंतोष गांगुर्डे, राजाभाऊ गांगुर्डे, सुजित मोरे, संतोष अहिरराव, दिगंबर लोहिते, गफ्फार शेख, दीपक मोरे, सुनील गांगुर्डे. शगुन हॉलमध्ये झालेल्या बैठकीला राजेश पाटील, सुहास मोरे, गणेश बनकर, किरण लभडे, चंद्रकांंत बनकर, प्रशांत घोडके, मयूर गावडे, गोरख गांगुर्डे, दत्तात्रय काळे, भारत सूर्यवंशी, अंकुश वारडे, आरिफ काझी, अरूण लभडे2, नीलेश मोरे, आशिष बागूल, केशव बनकर, माधव बनकर, शाम निरभवणे, रोहित बोडाई आदींसह शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com