गावठी दारू अड्डा उध्वस्त; घोटी पोलिसांची कामगिरी

गावठी दारू अड्डा उध्वस्त;  घोटी पोलिसांची कामगिरी

घोटी । जाकीर शेख Ghoti

इगतपुरी तालुक्यातील Igatpuri Taluka घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरगाव बिटातील मोराच्या डोंगरावरील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गावठी दारू Liquor बनवण्याचे काम सुरु होते.

याबाबतची माहिती घोटी पोलीसांना समजताच पोलीस अधिक्षक सचिन पाटीलSuperintendent of Police Sachin Patil , अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी पोलीस पथकासह या ठीकाणी धाव घेत या जंगलात दोन ठीकाणी छापा टाकुन गावठी दारूसाठी लागणारे रसायन जागेवरच नष्ट केले.

पोलीसांची चाहुल लागताच दारू बनवणाऱ्या इसमांनी थेट जंगलात पळ काढला. दारू बनवणाऱ्या अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत असुन या कारवाईत पहील्या छाप्यात गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे ४० हजार रूपयाचे ८०० लीटर रसायन व २३०० रुपयाचे साहित्य असा एकुण ४२३०० रुपये किम मतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला.

तर याच परिसरात दुसऱ्या ठिकाणी छापा मारत ३२१०० रुपयाचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करत मोठी कारवाई केली. या धडक कारवाईत जवळपास ७५ हजाराचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पोलीस हवालदार शितल गायकवाड, प्रकाश कासार, संदीप मथुरे आदींनी सहभाग घेतला असुन अज्ञात आरोपींविरोधात घोटी पोलीस ठाण्यात Ghoti Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com