नाशिक । Nashik

जिल्हा भरात चोरी छुपे गावठी दारूच्या भट्ट्या सुरू असून अशाच प्रकारे मद्य निर्मिती करून मारूती व्हॅन गाडीतून गावठी दारूची वाहतूक करणार्या पंचवटीतील एकास राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी (दि.18) रात्री महामार्गावर बेड्या ठोकल्या आहेत. संशयीताच्या ताब्यातील गाडी व मद्यसाठा असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अतुल शशिकांत मुर्तडक (35 रा. शितळादेवी मंदिर रामवाडी) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. मुंबई आग्रा महामार्गावरून गावठी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधिक्षक डॉ.मनोहर अंचुळे व उपअधिक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्र्र.1 चे निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक सुरेंद्र बनसोडे, अरूण सुत्रावे जवान शाम पानसरे,विलास कुवर,धनराज पवार, सुनिल पाटील, अनिता भांड आदींच्या पथकाने गुरूवारी महामार्गावर सापळा लावला होता.

खबर्याने दिलेल्या माहितीवरून मुंबईकडून नाशिकच्या दिशेने भरधाव येणाजया एमएच 15 एएस 9941 मारूती व्हॅन अडवून संशयीत चालकास ताब्यात घेत पथकाने वाहन तपासणी केली असता मारूती व्हॅन मध्ये प्लॅस्टीकच्या गोण्यांमध्ये भरलेली गावठी दारू पथकाच्या हाती लागली. या कारवाईत वाहनासह 1 लाख 45 हजार 400 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक तपास दुय्यम निरीक्षक सुरेंद्र बनसोडे करीत आहेत.