विलासराव देशमुखांनी कार्यकर्ते जोडलेः आ.तांबे

विलासराव देशमुखांनी कार्यकर्ते जोडलेः आ.तांबे
विलासराव देशमुख

संगमनेर । प्रतिनिधी | Sangamner

आपल्या अष्टपैलू नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या विकासात (Development of Maharashtra) मोठे योगदान देताना माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख (Former Chief Minister late. Vilasrao Deshmukh) यांनी सतत कार्यकर्ते जोडले.

हसतमुख व अभ्यासू व्यक्तिमत्व (Humorous and studious personality) असलेले देशमुख हे राज्यातील कार्यकर्त्यांचे सदैव प्रेरणास्रोत राहिले असून त्यांच्यामुळे आजही युवकांना (youth) शक्ति मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) यांनी केले.

यशोधन संपर्क कार्यालयात स्व. देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, इंद्रजित थोरात, साई संस्थानचे विश्वस्त डॉ. सुहास आहेर, डॉ. अशोक हजारे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे उपस्थित होते. विविध प्रश्नांची जाण असणारे देशमुख हे महाराष्ट्राचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.

विकास कामांची दूरदृष्टी (Vision of development works), तत्परता, हसतमुख स्वभाव यामुळे राज्यातील जनतेच्या मनावर त्यांनी अधिराज्य केले. त्यांनी सातत्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्यावर व संगमनेर तालुक्यावर (Sangamner taluka) खूप प्रेम केले. संगमनेर तालुका हा काँग्रेस पक्षाशी (congress party) कायम एकनिष्ठ राहिलेला आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात पक्षाचे मोठे काम होत असून अत्यंत महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळत आहेत. संगमनेर तालुक्यातील अनेक ऐतिहासिक योजना पूर्ण करताना देशमुख यांनी मोठे सहकार्य केले आहे.

संगमनेर शहरातील निळवंडे थेट पाईपलाईन योजना (Pipeline plan) ही देशमुख काळात मंजूर झालेली आहे. त्यांच्या आठवणी व केलेले कार्य हे महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देणारे असल्याचे तांबे म्हणाले. स्व. देशमुख यांनी तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. काँग्रेस पक्षाची भक्कम फळी त्यांनी उभी केली. अनेक तरुणांना मोठ्या संधी दिल्या. ना. थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यात व उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस (congress) अधिक सक्षम करत तरुणांनी देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करावे असे आहोळ म्हणाले. यावेळी आहेर, सांगळे, गौरव डोंगरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com