
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक जिल्हा माहिती अधिकारी पदी विलास बोडके यांची नियुक्ती झाली आहे. राज्य शासनाने याबाबत आदेश काढले आहेत.
विलास बोडके यापूर्वी धुळे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते. तत्पूर्वी ते जिल्हा माहिती अधिकारी म्हणून जळगाव, नंदुरबार येथे तसेच मालेगाव, पुणे आणि मंत्रालय येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत विविध पदांवर सेवा बजावली आहे.