रावण दहनास नागरिकांची गर्दी

रावण दहनास नागरिकांची गर्दी

नाशिक। प्रतिनिधी Nashik

दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी आज विजयादशमीच्या सायंकाळी शहरात रावण दहनाचे कार्यक्रम झाले. त्यात गांधीनगर व पंचवटी परिसरातील रावण दहनाच्या कार्यक्रमांस नागरीकांंचा उदंड प्रतीसाद लाभला. नाशिककरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या रामकुंडावरील या परंपरेचे हे 55 वे वर्ष होते. यंदा साठ फुटी रावणाचे दहन पंचवटीत करण्यात आले.

गंगापूररोड व कॉलेजरोड, राजीवनगर, इंदिरानगर येथे दसर्याच्या दिवशी रावण दहन करण्याची प्रथा पूर्वापार पाळण्यात येते. रावणाच्या मुखवट्याची आकर्षक सजावट करण्यात आली होतीे. रावन दहनानंतर जय श्रीरामाचा प्रचंड जयघोष झाला.

चतुसंप्रदाय आखाड्यातर्फे ही परंपरा अखंड सुरु आहे. महंत दिनबंधुदास महाराज या आखाड्याचे प्रमुख असताना त्यांनी 1967 साली या रावणदहनाची प्रथा सुरू केली. त्यानंतर महंत कृष्णचरणदास यांनी ती कायम ठेवली. दहनापूर्वी राम, लक्ष्मण, सीता, रावण, बिभीषण व वानरसेना यांची पंचवटी परिसरातून पारंपारिक मिरवणूक काढण्यातआली.

मिरवणूक गांधी तलावाशेजारील मैदानावर आल्यावर त्याठिकाणी श्रीरामाची वानरसेना व रावणाच्या सेनेत तुंबळ लढाई झाल्यावर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.त्यानंतर रावण दहनाचा सोहळा आ. राहुल ढिकले, माजी महापौर अशोक मुर्तडक, बाळासाहेब सानप, सतीश शुक्ल आदींच्या उपस्थितीत झाला. रावण दहनाच्या कार्यक्रमानिमित्त पंचवटी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com