स्वयंसेवकांचे सघोष पथसंचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव
स्वयंसेवकांचे सघोष पथसंचलन

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शहरासह तालुक्यात विजयादशमी (Vijayadashami) दसरा सण (Dussehra festival) आज पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साडेतीन मुहूर्तापैकी एक पुर्ण मुहूर्त असल्याचे औचित्य साधत इलेक्ट्रॉनिक्स् साहित्यासह (Electronics materials) ट्रॅक्टर, दुचाकी व सुवर्ण अलंकाराची खरेदी उत्साहात केली गेली.

दसर्‍यानिमित्त अनेक व्यावसायिक प्रतिष्ठानांचा शुभारंभ व वास्तूंचे भुमीपूजन (bhumipujan) देखील केले गेले. मात्र यंदा देखील मंदी व अतीवृष्टीचा (heavy rain) फटका बाजारपेठेस बसला असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. दरम्यान, विजयादशमी उत्सवाचे औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे यंदा देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (Rashtriya Swayamsevak Sangh) सघोष व सदंड पथसंचलन उत्साहात पार पडले. या संचलनाचे शहरवासियांनी उत्स्फुर्त स्वागत करत स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत करीत वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

गत 9 दिवसांपासून सुरू असलेल्या आदिशक्ती भगवतीच्या नवरात्रोत्सवाची (navratrotsav) सांगता आज विजयादशमी दसरा सण (Dussehra festival) साजरा करत मोठ्या उत्साहात केली गेली. दसरा पुर्वसंध्येस काल महानवमी असल्याने शहरातील सांडव्यावरील सप्तश्रृंगी माता मंदिर, कलेक्टरपट्टा भागातील साडेतीन शक्तीपिठ कुलस्वामीनी मंदिर, भवानी माता मंदिर, मातामठ तालीम संघ, तुळजाभवानी मंदिर, जुना आग्रारोडवरील सप्तश्रृंगी माता मंदिर, शहरातील कालिका मंदिर, भद्रकाली मंदिर, महालक्ष्मी मंदिर, कॅम्पातील आदिशक्ती भगवती मंदिर आदी मंदिरात दर्शनासाठी महिला, पुरूष भाविकांची एकच गर्दी उसळली होती. आज दसरा सणानिमित्त (Dussehra festival) भगवतीच्या मंदिरांमध्ये महापूजा व यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.

दसरा सणाच्या (Dussehra festival) पार्श्वभूमीवर शहरात चांदवड (chandwad), कळवण (kalwan), देवळा (devla), मनमाड (manmad), बागलाणसह (baglan) मालेगाव (malegaon) तालुक्यातील शेतकर्‍यांनी (farmers) झेंडू फुलांच्या (Marigold flowers) विक्रीसाठी मोसमपुल, सटाणानाका, संगमेश्वर, कॉलेजरोड आदी भागात काल रात्रीपासून दुकाने थाटली होती. शंभर ते दोनशे रूपये किलोपर्यंत झेंडू फुलांची विक्री केली गेली. आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातून भगव्या ध्वजास प्रमाण करून संचलनास प्रारंभ केला गेला.

रामसेतू, संगमेश्वर, दत्त मंदिर, आंबेडकर पुल, किदवाईरोड, नेहरू चौक, पाचकंदिल, टिळकरोड, तांबाकाटा, किल्ला पोलीस ठाणे मार्गे हे संचलन पुन्हा भुईकोट किल्यात आल्यावर येथे सांगता केली गेली. संचलन मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढून स्वयंसेवकांवर पुष्पांची वृष्टी करत या संचलनाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

जिल्हा संघचालक अशोक कांकरिया, शहर संघचालक नितीन मुनोत, जिल्हा कार्यवाह सुनिल चव्हाण, शहर कार्यवाह अतुल शिरूडे, राकेश मालपुरे, कल्पेश कांकरिया आदींसह ज्येष्ठ स्वयंसेवक, सामाजिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने संचलनात सहभागी झाले होते. शहराच्या चारही भागांमध्ये शस्त्रपुजनाचा उत्सव देखील विजयादशमीनिमित्त मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास शहरातील मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com