विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यमाच्या वतीने हिंदी दिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यमाच्या वतीने हिंदी दिन उत्साहात साजरा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

हिंदी भाषेचे (Hindi language) महत्व आत्मसात करणे व तिच्यावर विद्यार्थ्यांसह सर्वांचे प्रेम निर्माण करणे या हेतूने विद्या प्रबोधिनी प्रशाला, इंग्रजी माध्यमाच्या (Vidya Prabodhini Prashala, English medium)वतीने हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. राकेश वळवी उपस्थित होते. यावेळी ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी निलिमा दलाल यांनी संगीतबद्ध केलेले स्वागतगीत विद्यार्थ्यांनी गायले. शाळेच्या प्राचार्या डॉ. अंजली सक्सेना यांनी प्रमुख पाहुण्यांना प्रभू श्रीरामाची प्रतिमा व उपप्राचार्यां जयसुधा नायडू यांनी त्यांना रोप देऊन सत्कार केला.पाहुण्यांचा परिचय व स्वागत

वृषाली निळे यांनी केले. देशातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषेचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांची भाषा समृद्ध करणे तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे ह्या हेतूने हिंदी दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी कबीरचे दोहे आणि रॅप गाणे गायले.यावेळी रिया शिंदे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्या डॉ. अंजली सक्सेना, उपप्राचार्यां जयसुधा नायडू ,पर्यवेक्षक प्रियांका भट यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी आभार स्मिता आहिरे यानी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com