केटीएचएम कॉलेजला रंगणार विद्राेही साहित्य संमेलन

केटीएचएम कॉलेजला रंगणार विद्राेही साहित्य संमेलन

नाशिक | Nashik

संविधान सन्मानार्थ आयोजित विद्रोही साहित्य संमेलनास छत्रपती शाहू महाराज व सत्यशोधक चळवळीचा वारसा असलेल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात जागा मिळाली आहे.

याबाबत सहकार्य मिळणेण्याचे पत्र विद्रोही साहित्य संमेलनचे मुख्य विश्वस्त अॅड. मनीष बस्ते यांच्या मविप्र संस्थेस दिले होते. त्या नुसार संस्थेच्या सरचिटणीस निलिमा पवार यांनी मुख्य आवारातील मैदान मंडप उभारणीसाठी संस्थेने मान्यता दिल्याचे कळवले आहे.

विद्रोही मराठी साहित्य संमेलने ही महात्मा फुले यांच्या मराठी साहित्यविषयक भुमिकेवर आयोजित करत असता हे महाराष्ट्राला ज्ञात आहेच. राजर्षि शाहू महाराजांनी उधाेजी मराठा बोर्डींग व वंजारी वसतिगृहास (आजचे डोंगरे वसतिगृह) भेट दिल्याच्या घटनेस १०० वर्षे पूर्ण होत असल्याचे व विद्रोही आंबेडकरवादी साहित्यिक वामनदादा कर्डक, बाबुरावजी बागूल व कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतीचे औचित्य म्हणून १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक मध्ये आयोजित करत आहात याचा मविप्रसह सर्वच विशेष आनंद वाटत असल्याचे म्हटले आहे.

देशपाळीवरील सांस्कृतिक संमेलनासाठी संस्थेच्या मुख्य आवारातील कर्मवीर भाऊसाहेब हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयामागील मैदान मंडप उभारणीसाठी व इतर सहकार्य मागितले. देशातील मान्यवर साहित्यिक, कलावंत,सहभागी होणार असलेल्या या ऐतिहासिक उपक्रमाचे स्वागत करत आहोत.

संस्थेने आपल्या पत्रास सकारात्मक प्रतिसाद देत मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारी संदर्भातील शासकीय धोरण व नियम पाळण्याच्या अटीसह ही मान्यता देण्यात येत आहे, असे पत्र मविप्र संस्थेने दिले आहे.

मविप्र संस्थेचे शिक्षण अधिकारी प्रा. एस. के. शिंदे यांनी पत्र स्वागताध्षक्ष शशी उन्हवणे, मुख्य संयोजक राजू देसले, राज्य संघटक किशोर ढमाले, स्वागत समितीचे राज निकाळे, प्रभाकर धात्रक, व्ही. टी. जाधव यांच्याकडे सुपूर्द केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com