पिंपळगाव शेतकरी सोसायटी चेअरमनपदी विधाते

पिंपळगाव शेतकरी सोसायटी चेअरमनपदी विधाते

पिंपळगाव ब.। वार्ताहर | Pimpalgaon Basvant

येथील शेतकरी विकास सोसायटीच्या (Farmers Development Society) चेअरमनपदी संपत खंडेराव विधाते (Sampat Khanderao Vidhate as the chairman) यांची तर व्हा.चेअरमनपदी शंकर रंगनाथ बनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar) संस्थापक असलेल्या शेतकरी विकास संस्थेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत या संस्थेला बिनविरोध निवडीची परंपरा कायम असून नुकतीच झालेली निवडणूक प्रक्रिया (Election process) देखील बिनविरोध पार पडली.

त्यानुसार चेअरमन, व्हा.चेअरमन पदाच्या निवडीसाठी दिंडोरीचे सहाय्यक निबंधक महेश भडांगे (Mahesh Bhadange, Assistant Registrar, Dindori) यांचे अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली असता चेअरमनपदासाठी संपत विधाते यांनी अर्ज दाखल करून त्यावर सूचक म्हणून आमदार दिलीप बनकर यांनी तर अनुमोदक म्हणून काशिनाथ विधाते यांनी सही केली होती.

व्हा. चेअरमन पदासाठी शंकर बनकर यांनी अर्ज दाखल करून त्यावर सूचक म्हणून सुरेश खोडे यांनी तर अनुमोदक म्हणून बाळासाहेब बनकर यांनी सही केली होती. दिलेल्या मुदतीत वरील दोेन्ही पदांसाठी प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी (Returning Officer) यांनी जाहीर केले.

याप्रसंगी नवनिर्वाचित संचालक आमदार दिलीप बनकर, बाळासाहेब बनकर, काशिनाथ विधाते, सुरेश खोडे, चंद्रकांत बनकर, घमन खोडे, रावसाहेब खोडे, मोहन गांगुर्डे, गोरख देवकर, मंदाकिनी बनकर, उज्वला मोरे, सचिव नितीन कर्डेल आदींसह संस्थेचे सभासद व कर्मचारी उपस्थित होते. या निवडीनंतर सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. संस्था स्थापनेपासून आमदार बनकर यांनी सोसायटीच्या बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखली आहे.

दरवर्षी लाभांश वाटप संस्था स्थापनेपासून आमदार दिलीप बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था नेत्रदीपक अशी कामगिरी करत आली आहे. सहकारी संस्था अडचणीत असताना आमची संस्था प्रत्येक वर्षी बँक पातळीवर 100 टक्के वसुली करत सभासदांना लाभांश वाटप करीत आहे.

संपत विधाते, चेअरमन (शेतकरी विकास सोसायटी)

Related Stories

No stories found.