Video : ब्रेक फेल झाल्याने ट्रक कोसळला ५० फूट दरीत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक-मुंबई महामार्गावरील (Nashik-Mumbai Highway) कसारा घाटात (Kasara Ghat) मालवाहू ट्रकचे (Truck) ब्रेक फेल (Break failed) झाल्याने ट्रक ५० फुट दरीत कोसळल्याची (Accident) घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, इंदोरहून मुंबईकडे बटाटे घेऊन जाणाऱ्या ट्रकचे नाशिक-मुंबई महामार्गावर ब्रेक फेल झाले.

ट्रक चालकाने स्वतःच्या बचावासाठी गाडी कसाऱा फाट्याकडे वळवून उडी मारली. नंतर ट्रक थेट डिवायडर तोडून ५० फूट खोल दरीत कोसळला. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com