Video : अतुल पिठेकर याचा मृत्यू संशयास्पद; नातेवाईकांचा आरोप

Video : अतुल पिठेकर याचा मृत्यू संशयास्पद; नातेवाईकांचा आरोप

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

नवीन नाशिकमधील हॉटेल सोनालीमध्ये (Hotel Sonali) किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून नाशिकरोड (Nashikroad) येथील युवकाचा खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित अतुल सुभाष पिठेकर (Atul Pithekar) (१९) याचा मध्यवर्ती कारागृहात (Central Jail) हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला....

स्टेट बँक जवळील सोनाली हॉटेलमध्ये बुधवार (दि.२८ जुलै ) रात्री ०९: ४५ च्या सुमारास प्रसाद भालेराव ( २५ , रा . देवळाली गाव, राजवाड़ा) हे मित्रांसमवेत जेवण करायला गेले होते. यावेळी अनिल पिठेकर, निलेश दांडेकर (दोघे रा. इंदीरा गांधी वसाहत, लेखानागर) यांच्यासोबत किरकोळ कारणावरून प्रसाद याचे वाद झाले.

याचा राग मनात धरून पिटेकर व दांडेकर यांच्यासह चार ते पाच युवकांनी हॉटेल बाहेर शनि मंदिरासमोर प्रसादला मारहाण करीत त्याच्या डोक्यात फरशी टाकून गंभीर जखमी केले. त्याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले होते. याप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांना अटक केली होती.

यातील संशयित अतुल सुभाष पीठेकर (19) हा सुद्धा मध्यवर्ती कारागृहात खून प्रकरणी अटकेत होता. अतुल याची अचानक तब्येत बिघडल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तातडीने कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कारागृह रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अबिद अबू अत्तर (Dr. Abid Abu Attar) यांनी तपासून पिठेकर यास मयत घोषित केले. या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात (Nashikroad Police Station) आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान अतुल याचा मृत्यू हा घातपात असल्याचा त्याच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती कारागृह प्रशासनाचे अधिकारी जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अतुल याची प्रकृती गेल्या कित्येक दिवसापासून खालावली होती, मात्र त्या संदर्भात त्याच्या नातेवाईकांना कारागृह प्रशासनातर्फे कुठलीही कल्पना देण्यात आली नव्हती. यामुळे त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यावर संशय व्यक्त केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com