Video : राज्य महामार्ग १४८ कडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

Video : राज्य महामार्ग १४८ कडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य महामार्ग क्रमांक १४८ या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर अनेकदा अपघातदेखील घडत आहेत..

राज्य महामार्ग क्रमांक १४८ या महत्वाच्या रस्त्यावर पैठण, शेवगाव, नेवासा, संगमनेर, नांदूर शिंगोटे, सिन्नर, घोटी, शहापूर ही महत्वाचे तालुके जोडलेली आहे. पण खड्यांमुळे हा मार्ग ग्रामीण रस्त्याला लाजवेल अशा दुरवस्थेत गेला आहे.

दीड ते 2 फुट खोल आणि तीन ते 4 मीटर लांब विखुरलेले हजारो खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे या रस्त्याकडे कधी लक्ष जाणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com