नाशिक l Nashik

देशातील लोकांना लसीचे महत्त्व सांगण्यासाठी भारतात १६ मार्च राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. १६ मार्च २००५ मध्ये पोलिओचा पहिला डोस भारतात देण्यात आला.

त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा करतात. भारत पोलिओ मुक्त झाला असला तरी आता करोनाविरुद्ध लढा सुरु आहे.

करोनावरील लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्य्यात करोना युद्धांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.

लसीकरण केल्यानंतर या सर्वांचे अनुभव एकच आहे, आम्ही कोरोनाची लस घेतली. आम्ही काहीही त्रास झाला नाही. तुम्हीही बिनधास्त लसीकरण करुन घ्या...