Video : पहिल्याच दिवशी काळाराम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Video : पहिल्याच दिवशी काळाराम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील मंदिरे बंद होती. मात्र आता राज्यात करोनाचे (Corona) प्रमाण कमी होत असताना नवरात्रीच्या (Navaratri) पहिल्या माळेला राज्यभरातील मंदिरे (Temples) भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत...

मंदिर खुले झाल्याने अनेक मंदिरात आकर्षक रांगोळ्या काढून सजावट करण्यात आली आहे. सकाळपासूनच भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. यामुळे सुना झालेला मंदिराचा परिसर पुन्हा एकदा गजबजला आहे. भाविकांच्या आगमनाने मंदिरे पुन्हा एकदा भक्तीभावाने फुलुन गेली आहे.

काळाराम मंदिरात आज सकाळपासूनच भाविक दर्शनासाठी गर्दी दिसून आली. मंदिर परिसरात काळाराम संस्थानच्या वतीने सोशल डिस्टंसिंग, मास्क, थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपतर्फे प्रदेश संघटन महामंत्री श्रीकांतजी भारतीय यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.