Nashik News : ढगफुटीसदृश्य पाऊस की चक्रीवादळामुळे उडालेला पाण्याचा फवारा? नेमका प्रकार काय?

नाशिक जिल्ह्यातील घटना
Nashik News : ढगफुटीसदृश्य पाऊस की चक्रीवादळामुळे उडालेला पाण्याचा फवारा? नेमका प्रकार काय?

नाशिक | Nashik

राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) हजेरी लावत असून या पावसामुळे काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) ग्रामीण भागात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे...

Nashik News : ढगफुटीसदृश्य पाऊस की चक्रीवादळामुळे उडालेला पाण्याचा फवारा? नेमका प्रकार काय?
Aaditya Thackeray : "यह डर अच्छा है" असे म्हणत आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंसह सरकारवर हल्लाबोल

अशातच आता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामधील (Igatpuri Taluka) मुकणे धरण परिसरात (Mukne Dam Area) पाण्याचा फवारा आकाशात उडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. त्यामुळे हा ढगफुटीसदृश्य पाऊस आहे की चक्रीवादळामुळे उडालेला पाण्याचा फवारा हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसून याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

Nashik News : ढगफुटीसदृश्य पाऊस की चक्रीवादळामुळे उडालेला पाण्याचा फवारा? नेमका प्रकार काय?
Asian Games 2023 : रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले जोडीचा चीनमध्ये जलवा; टेनिसमध्ये भारताला मिळाले 'गोल्ड मेडल'

याबाबत अधिक माहिती अशी की, काल (दि.२९ सप्टेंबर) रोजी इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यावेळी एक अनोखा चमत्कार पाहायला मिळाला. मुकणे धरणातील पावसाचे फवारे हे आकशात उंच उंच उडत होते. त्यामुळे ढगफुटीसदृश्य पाऊस (Cloudburst-Like Rain) झाल्यामुळे हे उडत असावेत असा, दावा स्थानिकांनी केला आहे. तसेच धरणात एकाच ठिकाणी पाऊस पडत असल्याने अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण हा पाऊस अतिशय जोरात होता.

Nashik News : ढगफुटीसदृश्य पाऊस की चक्रीवादळामुळे उडालेला पाण्याचा फवारा? नेमका प्रकार काय?
Lok Sabha Election : मिशन ४५ साठी भाजपचा मेगाप्लॅन; 'या' विद्यमान आमदारांना उतरवणार रिंगणात

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने सगळीकडे या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे. तसेच आज हवामान विभागाने (Meteorological Department) नाशिक जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. तर उद्या म्हणजेच रविवारपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होईल,असे देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : ढगफुटीसदृश्य पाऊस की चक्रीवादळामुळे उडालेला पाण्याचा फवारा? नेमका प्रकार काय?
Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला ३० वर्षे पूर्ण; नेमकं काय घडलं होतं १९९३ साली? वाचा सविस्तर
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com