Video : नाशकात 'द बर्निंग इलेक्ट्रिक बाईक'चा थरार

Video : नाशकात 'द बर्निंग इलेक्ट्रिक बाईक'चा थरार

जुने नाशिक | प्रतिनिधी | Old Nashik

शहरातील एका इलेक्ट्रिक दुचाकी (Electric Bike) शोरूममध्ये सर्विसिंगसाठी आलेल्या इलेक्ट्रिक वाहनात अचानक शॉर्टसर्किट (Short Circuit) झाल्यामुळे आग लागली. त्यात दुचाकी जळून खाक झाली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

आग लागल्याचे समजताच वाहन शोरूमच्या बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टाळला. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने सुमारे अर्धा तास परिश्रम घेत आग आटोक्यात आणली.

Video : नाशकात 'द बर्निंग इलेक्ट्रिक बाईक'चा थरार
Gautami Patil : बोल तू होतेस का माझी परी?; शेतकरी पुत्राकडून गौतमीला लग्नाची मागणी

ही घटना आज (दि. 30) दुपारी 4 वाजेच्या सुमारास सारडा सर्कल येथे घडली. राजेंद्र तेलोरे असे इलेक्ट्रिक दुचाकीच्या मालकाचे नाव आहे. आग लागल्याचे समजताज आजूबाजूच्या दुकानदार तसेच परिसरातील नागरिकांनी बचाव कार्याला सुरुवात केली होती.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच शिंगाळा तलाव येथील मुख्य अग्निशामक केंद्रातील क्यू आर विशेष वाहन घटनास्थळी दाखल झाले तर किशोर पाटील, उदय शिर्के, सोमनाथ थोरात, राजेंद्र पवार, शरद बोटके आदी लीडिंग फायरम यांनी सुमारे अर्धा तास अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणली.

Video : नाशकात 'द बर्निंग इलेक्ट्रिक बाईक'चा थरार
IPL 2023 Final : अंतिम सामना जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनीची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; पाहा व्हिडीओ...

इलेक्ट्रिक वाहन आगीचे प्रकार वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर ज्या ठिकाणी हे शोरूम आहे त्याच्या मागे लोकवस्ती आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी शोरूमवाल्यांनी देखील दक्षता घेण्याची गरज यामुळे समोर आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com