Video : भुजबळांचा सोमय्यांना टोला; काही लोकांचा हा ब्लॅकमेलिंगचा धंदा

Video : भुजबळांचा सोमय्यांना टोला; काही लोकांचा हा ब्लॅकमेलिंगचा धंदा
छगन भुजबळ

येवला | Yeola

दोन दिवसांपुर्वी नाशिकला येऊन पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्यांवर आरोप करणारे भाजपचे नेते किरीट्ट सोमय्या (kirit somaiya) यांना भुजबळांनी चांगलाच टोला लगावला....

ही मीडिया ट्रायल (media trial)आहे. काही लोकांचा हा ब्लॅकमेलिंगचा धंदा आहे, अशी टीका सोमय्या यांचे नाव न घेता पालकमंत्री भुजबळांनी केली.

येवला दौऱ्यावर आले असतांना आज भुजबळांशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी किरीट्ट सोमय्या यांच्यांकडून होणाऱ्या आरोपासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, “ आम्ही जर बेकायदेशीर राहत असतो तर आम्हाला घराबाहेर काढलं असतं. आमच्याविरुद्ध तक्रार करा. यासंदर्भात खटले सुरु आहे. त्याची उत्तरे आम्ही देत आहोत. निवडणुका आल्या की ज्यांना काही कामधंदा नाही ते खोटं नाट बोलून ब्लॅकमेलिंगचा धंदा करतात. लोकांनी हे सर्व ओळखले आहे.”

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com