Video : महालक्ष्मींच्या आगमनाने चैतन्याला बहर

Video : महालक्ष्मींच्या आगमनाने चैतन्याला बहर
गौरी गणपती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लाडक्या गणरायाचे (God Ganesh) पूजन झाल्यानंतर भाद्रपदातील शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन झाले आहे. महिलांनी परंपरेनुसार मुहूर्तावर विधीवत पुजनाने गौरींचे स्वागत केले...

भारतीय परंपरा, संस्कृतीत गौरी (Gauri) हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनेक ठिकाणी गौराईचे पूजन महालक्ष्मी स्वरुपात केले जात असल्यामुळे याला महालक्ष्मी पूजन असेही संबोधले जाते.

गौरीला माहेरवाशीण म्हटले जाते. गौरीच्या रुपात पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते. गौरी आल्यानंतर ती 2 दिवस पाहुणचार घेते. अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन झाले आहे.

दुसर्‍या दिवशी म्हणजेच उद्या ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे पूजन होणार आहे. गौरी पूजनाची पद्धत, कुळाचाराप्रमाणे वेगवेगळी असते. तिसर्‍या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन होईल.

महाराष्ट्राच्या (Maharashtra) काही भागात मुखवट्याच्या, फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. नाशिक जिल्ह्यात (Nashik District) बहुतांशी मुखवटे सजवून पूजन केले. सोमवारच्या पुजनाला सर्वाधिक महत्व आहे.

ज्येष्ठा गौरींना आज घरी तुळशी वृंदावनाजवळून सवाद्य आणले गेले. लक्ष्मीप्रमाणे तिच्या पावलांचे ठसे संपूर्ण घरात उमटवण्यात आले. त्यानंतर त्यांना स्थानापन्न करण्यात आले. त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला.

उद्या महालक्ष्मीचे मनोभावे पूजन केले जाणार आहे. 16 भाज्या, खीर, गोड पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. शिवाय लाडू, चकल्या, करंजी असे विविध प्रकारचे फराळ, फळ यांचाही नैवेद्य दाखविले जातात.

महालक्ष्मींच्या (Mahalaxmi) आगामनामुळे बाजारात फुले, फुले, पत्री यांच्यासोबत फराळांच्या पदार्थांना चांगली मागणी दिसून आले. आजपासून दोन दिवस गणपतीबरोबरच महलक्ष्मीच्या आगमनामुळे चैतन्याला चांगलाच बहर आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com