आडगाव l Adgaon (प्रतिनिधी)

महापालिका प्रशासनांकडुन उपाय योजना करतांनाच व स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. विशेषत: शहरातील स्वच्छता गृहाची स्वच्छता व दुरुस्तीची कामे केली जात असतांनाच स्वच्छता अभियान 2021 मधुन पंचवटीतील आडगांवला वगळले कि काय? असा प्रश्न आडगांवकरांना पडला, असल्याचा आरोप शिवसेनेकडुन करण्यात आला आहे.

महापालिकेच्या पंचवटी विभागातील प्रभाग 2 हा भाग सर्वाधिक क्षेत्रफळाचा असतांना या प्रमाणात गावठाण व शिवारातील उपनगरांना अद्यापही आरोग्यसेवा पुरवविण्यात महापालिका प्रशासन असमर्थ ठरले आहे. आडगांव गावठाणाची लोकसंख्या 25-30 हजाराच्यावर असतांना या प्रमाणात स्वच्छतागृह व आरोग्य सेवेची सुविधा करण्यात आलेली नाही.

या ठिकाणी बस स्थानक परिसर परिसरात नागरिकांसाठी असलेल्या स्वच्छता गृहाची अवस्था प्रशासनला लाजविणारी असुन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारी आहे.

स्वच्छ सर्व्हेक्षणाची शहरात कामे सुरु असतांना याठिकाणी मात्र स्वच्छतागृहात आत जाणे अवघड झाले असुन सर्वत्र दुर्गंधीने आरोग्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष असुन अधिकारी याभागात फिरकत नाही.

अशाप्रकारे केविलवाणी अवस्था गेल्या अनेक वर्षापासुन असुन स्वच्छ सर्व्हेक्षणात या स्वच्छतागृहाची स्वच्छता व दुरुस्ती होईल अशी अपेक्षा आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांत तीव्र प्रक्रिया उमटल्या आहे. यासंदर्भात शिवसेना पंचवटी विभाग संघटक पोपट शिंदे यांनी दुरावस्थेतील स्वच्छतागृह पाडून टाकण्याचा इशारा दिला आहे.