Video : निफाड शहरात आगडोंब; ९ दुकाने जळून खाक

Video : निफाड शहरात आगडोंब; ९ दुकाने जळून खाक

निफाड | Niphad

निफाड रोड लगत असलेल्या शॉपिंग सेंटरला (Shopping Center) लागलेल्या आगीत (Fire) आज मध्यरात्री आग लागली. या आगीत ९ दुकाने जळून खाक झाली आहेत...

दुकानांना लागलेल्या आगीमुळे सुमारे 1 कोटी 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जळून खाक आहे.

अधिक माहिती अशी की, निफाड रोडलगत असलेल्या शॉपिंग सेंटरला काल रात्री अचानक आग लागली. सर्वप्रथम गॅरेजला आग लागली. गॅरेजमध्ये असेलेल्या ऑईलच्या डब्यांमुळे आग भडकली आणि सुमारे ९ दुकाने या आगीत जळून खाक झाली आहेत.

दरम्यान, निफाड तालुक्यात (Niphad Taluka) एकही अग्निशमन दलाचा (Fire brigade) बंब नसल्याने नाशिकहून (Nashik) अग्निशमन दलाचा बंब मागविण्यात आला. परंतु बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत सुमारे दोन तासांचा कालावधी उलटला.

यामुळे बंब येईपर्यंत सुमारे ९ दुकानांचे नुकसान झाले आहे. या आगीत १ कोटी २९ लाख ४१ हजार ५१० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कामगार तलाठी खडांगळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com