... अन शेतकर्‍यांचा विजय : राऊत

... अन शेतकर्‍यांचा विजय : राऊत

नवीन नाशिक । प्रतिनिधी Navin Nashik

चलेजावच्या चळवळीमुळे इंग्रजांना जसे पळून जावे लागले तसे दीड वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या (farmers) आंदोलनामुळे (Movement) पंतप्रधान मोदींनी (Prime Minister Modi) माघार घेत शेतकर्‍यांचे कायदे मागे घेतले आणि शेतकर्‍यांचा विजय झाला असे प्रतिपादन शिवसेना (shiv sena) नेते खा. संजय राऊत (mp sanjay raut) यांनी व्यक्त केले.

प्रभाग 28 चे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी राऊत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर (vijay karanjkar), खा. हेमंत गोडसे (mp hemant godse), महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर (sudhakar badgujar), माजी जिल्हा प्रमुख सुनील बागुल (sunil bagul), माजी आमदार वसंत गिते (vasant gite), विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते (ajay boraste), माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, गटनेते विलास शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी आपल्या भाषणात राऊत यांनी भाजपवर (bjp) निशाणा साधला. यावेळी बोलतांना राऊत पुढे म्हणाले की, ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’ या संत वचनाप्रमाणे आम्ही 50 वर्षांपासून काम करत आहो. ‘चलेजाव’ची चळवळ झाली संपूर्ण देश रस्त्यावर उतरला म्हणून ब्रिटिश सरकार (British Government) पळाले. आम्ही करेक्ट कार्यक्रम करत महाराष्ट्रात (maharashtra) दोन वर्षापूर्वी स्वतंत्र करत भगवा फडकवला.

नाशिकच्या (nashik) शिवसैनिकांचे संपर्क कार्यालय बघून समाधान वाटते, त्यांचा जनसंपर्क ही दांडगा आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) शिवसेनेचे 100 नगरसेवक निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सभेप्रसंगी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहून राऊत यांनी समाधान व्यक्त करत महिला आघाडीच्या महिलांचे कौतुक केले. यावेळी सर्व शिवसैनिक, नेते, नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी,कार्यकर्त्या तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

फ्लॉवर्स पार्कचा शुभारंभ

सातपूर । Satpur

हा राजकिय कार्यक्रम नसुन येथे परदेशात आल्यासारखे वाटुन मन प्रसन्न झाले असुन येथे कूटुंबासोबत यायला हवे असे मत खा.संजय राऊत यांनी व्यक्त केले. शुभम वाटर पार्कचे (Shubham Water Park) तिसरे वर्ष नाशिककरांच्या (nashik) सेवेत दाखल झाले असून, कोविडच्या (covid-19) दोन वर्षाच्या प्रदीर्घ अंतराळानंतर या पार्कचा शुभारंभ खा.संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, सुनील बागुल, गटनेते विलास शिंदे , छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर, नगरसेविका सीमाताई निगळ, हेमलताताई कांडेकर, इंदुबाई नागरे तसेच गोकुळ नागरे, देवा जाधव, दिनकर काडेकर, सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते. या पार्कच्या विविध सौदर्य स्थळांची माहीती नगरसेवक शशिकांत जाधव, संचालक शुभम जाधव, शंतनु जाधव यांनी करुन दिली.

पक्षांतराची रंगली चर्चा

आज शहरात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) हे उपस्थित असताना शिवसेनेच्या नेत्यांच्या हस्ते प्लॉवर पार्कचे (Plover Park) उद्घाटन केल्याने व कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित असल्याने पक्षांतराबाबत खमंग चर्चा रंगलेली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com