भाजपकडून विजयी जल्लोष

स्थानिक निवडणुकीतही इतिहास घडवू : निकम
भाजपकडून विजयी जल्लोष

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

विधान परिषद (Legislative Council) निवडणुकांचा निकाल (Election results) जाहीर होताच संपूर्ण राज्यात भाजप (bjp) गटात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात येत असून

मालेगाव (malegaon) येथेही जिल्हाध्यक्ष सुरेश निकम (District President Suresh Nikam), शहराध्यक्ष मदन गायकवाड (City President Madan Gaikwad) यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी व एकमेकांना मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

कुठलाही गाजावाजा न करता राज्यात देवेंद्र फडवणीस (Devendra Fadwanis) यांनी विधान परिषद (Legislative Council) निवडणुकीत (election) इतिहास रचला. तसाच इतिहास मालेगाव तालुक्यात (malegaon taluka) सर्वांना सोबत घेऊन आपल्याला देखील घडवायचा असल्याचे नंदू सोयगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. आगामी निवडणुकांना सामोरे जातांना सर्वांनी एक खुणगाठ बांधायची आहे.

यापुढील निवडणुका अद्वय हिरे, सुनील गायकवाड व मी स्वतः सर्वांच्या संमतीने निर्णय घेऊन योग्य उमेदवार देत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी सांगितले. यावेळी देवा पाटील, रवीश मारू, मंजुषा कजवाडकर, यु.आर. पाटील, देवीदास कुवर, दीपक गायकवाड, दिनेश साबणे, भरत बागूल, कुणाल सूर्यवंशी, स्वप्नील भदाणे, सुनील शेलार, श्याम गांगुर्डे, कमलेश सोनवणे, युवराज गीते,

सचिन बाचकर, हेमंत पुरकर, दर्शन गायकवाड, प्रकाश सुराणा, बापू वाघ, बाळासाहेब सावकार, सतीश उपाध्ये, नेविलकुमार तिवारी, राजेंद्र वाजपेयी, शेख इब्राहिम, सलमान मजीद, मुकीम अस्लम पटेल, सद्दाम हुसेन, नितीन खरे, समाधान बच्छाव, सिद्धार्थ वारुळे, यश आघारकर, नीलेश सोनवणे, नाना मराठे, निसार शेख, प्रितेश गायकवाड, रजत सोनवणे, संदीप गायकवाड, पप्पू पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com