पशुवैद्यकीय दवाखाने ओस

पशुवैद्यकीय दवाखाने ओस

शिरवाडे वणी । वार्ताहर | Shirvade Vani

सध्या जनावरांची संख्या कमी झाल्याने शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याची (Government Veterinary Clinic) देखभाल होत नसल्याने व जनावरेही उपचारासाठी येत नसल्याने हे दवाखाने नामशेष होण्याच्या मार्गाने वाटचाल करीत असून त्यांची आता पडझड होऊ लागली आहे.

ग्रामीण भागात पूर्वीच्या काळी शेती तयार करण्यासाठी किमान एक व जास्त जमिनी असलेल्या शेतकर्‍यांकडे (farmers) दोन ते तीन बैल जोड्यांच्या सहाय्याने शेती मशागत (Farming) करून बैलांचे संगोपन केले जात असे. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे (Modern technology) नवनविन यंत्रसामग्री अस्तित्वात आल्याने त्याद्वारे शेतीमशागत कमी वेळेत होत असल्याने बैलांचा वापर कमी झाला असून बैलजोडी सांभाळणे देखील परवडेनासे झाले आहे.

पूर्वीच्या काळी प्रत्येक कुटुंबाकडे चार ते पाच गायी निश्चित राहत असे. त्यातून शेतीला दुग्ध व्यवसायाची (Dairy business) जोड मिळत असे. कुटुंबातील महिला हेच दूध विक्री करून भाजीपाला (vegetables) व घर खर्चाला हातभार लावत असे. परंतु आता दुभती जनावरेही कमी होवू लागली असून त्याऐवजी कमी चार्‍यावर पोषण होणार्‍या शेळीपालनाकडे कल वाढू लागला आहे. मोठ्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून जनावरांचे आरोग्य राखण्यासाठी गावागावात तयार झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांना (veterinary clinics) देखील आता उतरती कळा लागली आहे.

त्यातच या जनावरांचे पालन, पोषण, सोड, बांध, चारापाणी करण्यात एक माणूस दिवसभर राबस असल्याने मोठी दुभती जनावरे पाळणे खर्चिक होऊ लागले आहे. त्यामुळे जेथे शेतीचे उत्पादन कमी अशा ठिकाणी तरूण पिढी आता पोल्ट्री व्यवसायाला महत्व देवू लागली आहे. पोल्ट्रीफार्म वर पशुवैद्यकीय अधिकारी थेट पोल्ट्री शेडमध्ये येवून कोंबड्यांवर उपचार करीत असल्याने हा व्यवसाय करणार्‍यांना ते सोईचे वाटत आहे. तर जनावरांची संख्या कमी झाल्याने या दवाखान्यात काम करणारे आपले इतरत्र बदली करून घेऊ लागले आहे.

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून शिरवाडे वणी येथील शासकीय पशुवैद्यकीय चिकित्सक बदलून गेले असून आवश्यक तेवढ्या प्रमाणात जनावरे नसल्यामुळे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नव्याने नियुक्ती करून घेण्यासाठी चिकित्सक कानाडोळा करत आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्याची देखभाल होत नसल्यामुळे दवाखाना बंद पडण्याच्या मार्गावर असून येथे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत असतांनाही पशु अधिकारी मात्र पाहिजे त्या प्रमाणात जनावरे नसल्याने येथे येण्याचे टाळत असल्याचे चित्र दिसत असून जनावरांअभावी दवाखान्यांना उतरती कळा लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com