अकरावी प्रवेशासाठी अर्जांची पडताळणी
नाशिक

अकरावी प्रवेशासाठी अर्जांची पडताळणी

चोवीस हजार अर्जांची पडताळणी

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील 60 उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमधील 25 हजार 270 जागांवर अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

आतापर्यंत तब्बल 30 हजार 591 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे.यातील 24 हजार 933 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाचा भाग एक भरून पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर 19 हजार 727 विद्यार्थ्यांनी आवडीच्या विद्याशाखासह महाविद्यालयांची निवडही केली आहे. नाशिक महपालिका क्षेत्रांतील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत 12 ऑगस्टपासून ऑनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली.

विद्यार्थ्यांना 22 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. त्यानंतर 23 ऑगस्टपासून अकरावीच्या नियमित प्रवेश फेर्‍यांमधील प्रथम प्रवेश फेरीस सुरुवात होणार असून 25 ऑगस्टपर्यंत सर्व पात्र विद्यार्थ्यांची प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून विद्यार्थ्याना या यादीवर हरकती नोंदवता येणार आहे.

या सर्व हरकतींवर शिक्षण उपसंचालक निर्णय घेऊन 30 ऑगस्टला प्रथम फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून विद्यार्थ्यांनीही त्यांच्या लॉगिन आयडीवर त्यांना मिळालेले महाविद्यालय कळणार आहे.

तसेच संबंधित महाविद्यालयांनाही त्यांच्या लॉगिन वर विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध होणार असून 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत प्रथम फेरीतील अंतिम प्रवेश प्रकिया राबविली जाणार आहे. याच दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत महाविद्यालयांना प्रवेशित विद्यार्थ्यांची माहीत संकेत स्थळावर अपलोड करावी लागणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com