महानगर पालिकेकडून रुग्णांच्या बिलांची छाननी
नाशिक

महानगर पालिकेकडून रुग्णांच्या बिलांची छाननी

मध्यवर्ती नियोजनासाठी खाटा आरक्षण संगणक प्रणाली

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयामधील बिलासंबंधी लेखापरीक्षण विभागामार्फत कोविड रुग्णांलयांसोबतच नॉन कोविड रुग्णालयातील इतर सर्व रुग्णांच्या बिलांची पूर्ण छाननी करण्यात येत आहे. दरम्यान शहरातील 14 खासगी रुग्णालयातील शंभर टक्के बेड (एकूण 630 बेड) कोविड साठी आरक्षित करण्यात आले आहेत व 25 खासगी रुग्णालयातील बेड (एकूण 511 बेड) अंशत: कोविडसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.

शहरातील या खासगी रुग्णालयातील खाटा रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक महानगरपालिकेतर्फे मध्यवर्ती बेडचे नियोजन करण्यासाठी Centralised Bed Reservation System (CBRS) ही संगणक प्रणाली तयार करण्यात आलेली आहे. या संगणक प्रणालीद्वारे रुग्णालयात भरती झालेले रुग्ण व रिक्त बेड संख्या यांची अचूक माहिती प्राप्त होणार आहे व त्यानुसार खाटांचेे नियोजन करण्यात येणार आहे. कोरोना बाधित रुग्णांना हॉस्पिटलची गरज असल्यास नाशिक महानगरपालिकेच्या हेल्पलाइन क्रमांक 9607623366 या क्रमांकावर फोन केल्यास रुग्णांच्या लक्षणांनुसार त्यांना रुग्णालय व रुग्णालयातील बेड क्रमांक निर्धारित करण्यात येईल. सदर हेल्पलाईन 24 बाय 7 सुरु राहणार आहे.

रुग्णालयात रुग्ण भरती झाल्याबरोबर सदर संगणक प्रणालीमध्ये रुग्णाची संपूर्ण माहिती तत्काळ भरली जाईल. आरक्षित केलेल्या खाटा संख्येनुसार व भरती रुग्ण संख्येनुसार एखाद्या रुग्णालयातील रिक्त बेडची संख्या मनपा मुख्यालयात स्थापन केलेल्या हेल्पलाइन कक्षास त्याच क्षणी प्राप्त होणार असून त्यानुसार रुग्णास संदर्भित करणे सोयीचे होणार आहे. यासाठी हेल्पलाइन कक्षाला रुग्ण कोणत्या रुग्णालयात संदर्भित करावा याचे नियोजन करता येणार आहे.

याप्रमाणे संगणक प्रणाली तयार झालेली आहे मनपाने कोविडसाठी पूर्णपणे आरक्षित केलेले खासगी रुग्णालय, अंशत: आरक्षित खासगी रुग्णालय व मनपा रुग्णालय यांची यादी व रुग्णालय निहाय बेडची संख्या या बाबतची माहिती नाशिक महानगरपालिकेचे संकेतस्थळ nashikcorporation.gov.in वर उपलब्ध आहे.

करोनासंदर्भात महापालिकेकडून हेल्पलाईन

खासगी हॉस्पिटलमध्ये बेड आरक्षित करणेसाठी - 9607623366

करोनासंदर्भात माहिती - 9607432233 व 0253-2317292

खासगी हॉस्पिटलचे बिलासंदर्भात तक्रारीसाठी - 9607601133

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com