नाशिक सिव्हिल रुग्णालयाला व्हेंटीलेटर्स दान

नाशिक सिव्हिल रुग्णालयाला व्हेंटीलेटर्स दान

नाशिक | Nashik

जगभरातील प्रत्येकाच्या आयुष्यात ज्याने प्रचंड खळबळ उडवून दिली. त्या कोविड-१९ आजाराची दुसरी लाट सध्या भारतात थैमान घालत आहे, देशात लाखो लोकांना संसर्ग झाला असून त्याचा प्रसार लक्षणीय वेगाने होत आहे.

या महाप्रचंड महामारीच्या विरोधात अतिशय साहसाने लढत असलेल्या वैद्यकीय क्षेत्राचे बळ अधिक जास्त वाढावे यासाठी एपिरॉक मायनिंग इंडिया लिमिटेडने नाशिक सिव्हिल रुग्णालयाला पाच व्हेंटीलेटर्स दान केले आहेत.

नाशिक सिव्हिल रुग्णालय सरकारी असून नाशिकमधील वैद्यकीय सेवासुविधांचा कणा मानले जाते, याठिकाणी कोविड-१९ सह इतर सर्व आजारांवर मोफत उपचार पुरवले जातात. एपिरॉकने दान केलेल्या व्हेंटीलेटर्समुळे गंभीर, जीवनरक्षक उपचारांची व देखभालीची आवश्यकता असलेल्या रुग्णांना खूप लाभ मिळणार आहेत.

या व्हेंटीलेटर्ससोबत कंपनीने सर्जिकल मास्क्स देखील दिले असून त्यामुळे समाजाच्या सेवेसाठी अथक प्रयत्नशील असलेल्या रुग्णालय कर्मचाऱ्यांना मदत होईल. सिव्हिल सर्जन आणि नाशिक सिव्हिल रुग्णालयाचे अधिकारी डॉ. अशोक एस थोरात यांनी हा समन्वय घडवून आणण्यात खूप मोठे साहाय्य केले.

त्यांनी सांगितले, "एपिरॉकने आमच्या रुग्णालयाला दिलेल्या या मोलाच्या मदतीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. यामुळे आम्हाला अधिक जास्त रुग्णांचे प्राण वाचवता येतील आणि सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत आम्हाला जितकी जास्त मदत मिळेल तितके जास्त लाभ आमच्या रुग्णांना मिळू शकतील."

सिव्हिल रुग्णालयातील सर्व कर्मचारी, लाईफ केयर बायो-मेडिकलची टीम यांनी अडचणीच्या काळात खूप मेहनत घेतली व ही सर्व उपकरणे तातडीने इन्स्टॉल करवली यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. सिव्हिल रुग्णालयातील सिव्हिल सर्जन डॉ. किशोर श्रीवास आणि एपिरॉकचे सीएसआर अधिकारी श्री. धनाजी पुरी यांनी हा सहयोग घडवून आणण्यात उल्लेखनीय भूमिका बजावली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com