नाशिकरोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांची तोडफोड

अज्ञातांवर गुन्हा दाखल
नाशिकरोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांची तोडफोड

नाशिकरोड । Nashik

गेल्या काही दिवसापासून नाशिकरोड परिसरातील उपनगर देवळाली गाव जेलरोड आदी परिसरात अज्ञात समाज कंटकाकडून मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार होत आहे.

देवळाली गाव येथील राजवाडा परिसरात सुद्धा रात्री त्यांनी शाळेच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेतील वाहनांची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळालीगाव राजवाडा येथील व्यायामशाळेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या वसाहतीत अज्ञातांनी वाहनांना लक्ष्य केले. रात्री चाकरमान्यानी काम करून आपले वाहने रस्त्याच्या कडेला नेहमी प्रमाणे लावली. रात्री उशिरा उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या तर दुचाकींवर देखील हल्ला करण्यात आला.

अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत अल्टाेकार (एमएच१५/डीसी/१२२२), रिक्षा (एमएच१५/ईएच/२९८२), टेम्पेा (एमएच१९/एक्यु ७८३६), मोटारसायकल (एमएच१५/जीई/७१७१), ॲक्टीव्हा दुचाकी (एमएच१५/ईसी/७१९८) या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com