लेखानगर परिसरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

लेखानगर परिसरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

नवीन नाशिक | Nashik

लेखानगर परिसरातील सुंदरबन कॉलनी येथे रविवारी रात्री अज्ञात समाजकंटकानी सात कार च्या काचा फोडुन परिसरात दहशत निर्माण केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लेखानगरच्या मागील सुंदरबन कॉलनी येथे रविवारी रात्री दोन ते तीन दुचाकीवर ३ ते ४ अज्ञात समाजकंटकांनी काठीने व दगडाने घरासमोर लावलेल्या सात कारच्या काचा फोडुन परिसरात दहशत निर्माण केली व फरार झाले.

घटनेची माहिती पोलिसांना समजताच सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे हे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. अज्ञात समाजकंटकांनी कार च्या काचा का फोडल्या हे समजु शकले नाही. काचा फोडणारे संशयितांची माहिती मिळाली असुन लवकरच त्यांना अटक केले जाईल असे पोलिसांनी सांगितले.

रात्री उशिरा अंबड पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटने मुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com