देवळाली
देवळाली|Picasa
नाशिक

देवळाली परिसरात वाहनांची तोडफोड

गुन्हा दाखल

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

जुन्या भांडणाच्या कुरापतीतून टोळक्याने एकास मारहाण करत वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार सोमवारी (दि.27) देवळाली गावात घडला.

सनी चटोले, शंकर गायकवाड, साहिल मांगकाली (रा. रोकडोबावाडी, नाशिकरोड) अशी मारहाण करणार्‍या संशयितांचे नाव आहे.

याप्रकरणी संदिप राजेंद्र बागडे (वाल्मिकनगर, देवळाली गाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयितानी जुन्या कुरापतीतून बागडे यांच्या शेजारी राहणार्‍या गौतम गडीवाल यास मारहाण करत असताना बागडे भांडण सोडवण्यासाठी गेले होते. याचा राग आल्याने संशयितांनी बागडे यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली तसेच त्यांची कारच्या काचांवर दगड तसेच बाटल्या फेकून तोडफोड केली.

तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षवर दगड फेकून मारत काच फोडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक पी.ए. परदेशी करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com