निकृष्ट रस्त्यांमुळे वाहने खड्ड्यात

निकृष्ट रस्त्यांमुळे वाहने खड्ड्यात

पुनदखोरे । संदिप जगताप | Punadkhore

कळवण (kalwan) शहरातील रस्त्याच्या निकृष्ट झालेल्या कामामुळे वाहनचालकांना खड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने चक्क खड्ड्यात जात आहे. त्यामुळे वाहनांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याला सार्वजनिक बांधकाम विभागाच (Department of Public Works) जबाबदार असल्याची ओरड वाहनचालक करीत आहे.

काल सायंकाळच्या सुमारास शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे (heavy rain) मेनरोडला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले होते. पाण्याचा निचरा (Drainage) करण्यासाठी सा. बां विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्याने व्यापारी तसेंच छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक यांच्या दुकानामध्ये पाणी गेल्याने त्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. दोन वर्षांपासून अत्यन्त संथगतीने सुरु असलेले रस्त्याचे काम (Road work) निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची चर्चा शहरात होत आहे.

रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी मोठे पाईप टाकण्यात आले आहेत. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे स्टेट बँक कॉर्नर जवळ माती टाकण्यात आलेल्या खड्ड्यात चक्क अल्टो कार (एम. एच.19. सी. वाय.3242) गेल्याने वाहन चालकाला किरकोळ दुखापत झाली. परंतु अल्टो कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. वाहन खड्ड्यात पडल्याने शहरात गवगवा होऊ नये म्हणून रात्रीतूनच जेसीबीच्या सहाय्याने निकृष्ट खड्डे बुजविण्यात आले.

शहराच्या मेनरोडवरील खड्ड्यावर वाहन चालकासह पायी चालणार्‍या नागरिकांना खडड्यांचा अंदाज येत नसल्याने ते या खड्ड्यामध्ये पडत आहेत. यात त्यांना मोठी दुखपत होत आहे. तर वाहनांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दुर्दैवाने मोठा अपघात होऊन काही जीवितहानी झाल्यास याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल कि ठेकेदाराची ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खराब रस्त्यामुळे कळवण आगाराची बस पलटी

मोहबारी । वार्ताहर | Mohbari

कळवण (kalwan) आगारातून विरशेतकडे जाणारी ( एम 14 बीटी 1059) ही मुक्कामी बस वेरूळे फाटा पासून 100 मिटर अंतरावर असलेल्या कळवण हतगड रस्त्यावरील पुलाजवळ पलटी झाल्याची घटना काल रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली.

बस घेऊन चालक आर. टी. गवळी व वाहक हेमंत राऊत विरशेतकडे जात असतांना पुलावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने बस खड्ड्यात आदळली व बसचा पाटा तुटून बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी ड्रायव्हर साईडला नाल्यात पलटी झाली. सुदैवाने गाडीत चालक व वाहक सोडून प्रवाशी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात चालक व वाहक यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी कळवण येथे नेण्यात आले आहे.

कळवण तालुक्यातील रस्यांची अवस्था भयानक झाली असल्याने रस्त्यात खड्डे (potholes) की खड्डयात रस्ता हेच समजत नाही. त्यातच सध्या या परिसरात जोराचा पाऊस सुरू असल्याने रस्त्यातील खड्डे पाण्याने भरलेले असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही परिणामी अशा अपघात घडतात. खराब रस्ता असल्याने रस्ते वाहतूकीत अशा प्रकारे होणार्‍या अपघातांना जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com