जेहान सर्कलवरील नाकाबंदीने वाहनधारक त्रस्त

जेहान सर्कलवरील नाकाबंदीने वाहनधारक त्रस्त

सातपूर । प्रतिनिधी

शहरातील करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. दरवेळेप्रमाणे गंगापूर पोलिसांनी मात्र अतिशय काटेकोरपणे जेहान सर्कल दोन्ही बाजूंनी पूर्ण लॉक करून रोगाचा फैलाव रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने शहरातील सर्व रस्त्यांवर बॅरिकेडिंग लावून वाहतुकीच्या गतीला रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या ठिकाणी वाहनांना अडवून त्यांच्या फिरण्याची कारणे विचारणे सोयीचे जावे म्हणून एका वाहनाला जाण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे बरेच चौफुलींवर वाहतुकीची गर्दी दिसत असली तरी त्यामुळे वाहनचालकांना विनाकारण रस्त्यावर उतरण्याची जागृतता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

याउलट गंगापूररोडवरील जेहान सर्कल नेहमीचेच नाकाबंदीचे हॉट सेंटर आहे. शहरात नाकाबंदी सर्वप्रथम येथेच करण्याचा होरा पाहायला मिळतो. गंगापूर पोलिसांच्या माध्यमातून जेहान सर्कलवर आकाशवाणीकडे जाणार्‍या व महात्मानगरकडे जाणार्‍या दोन्ही मार्गांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. हे मार्ग पूर्ण लॉक का केले याचे उत्तर साहेबांचे आदेश असल्याचे सांगितले जाते.

मागील लॉकडाऊनपेक्षा यावेळी राज्य शासनाने वाहनचालकांना बाहेर पडण्यास परवानगी दिली आहे. सबळ कारणाची विचारणा न करता थेट रस्ते बंद करणे म्हणजे हा हॉटस्पॉट आहे काय? पोलिसांच्या दंडेलीचा पुन्हा एकदा प्रत्यय दिसून येत आहे.

त्रस्त वाहनचालक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com