
दहिवड | प्रतिनिधी | Dahiwad
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चिंचवे गावाजवळ असलेल्या सांगवी फाटा येथे कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणाऱ्या पिकअपचा अपघात झाल्याची घटना घडली आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप गाडी क्रमांक एम. एच. 41 जी. 3273 यामध्ये दाटीवाटीने पाळीव गोवंश जनावरे भरून जाणाऱ्या पिकअप गाडीचा पाठलाग करत असताना पिकअप महामार्गावर असलेल्या डिव्हाडरवर धडकली.
प्राणीन फाउंडेशनचे गोरक्षक सदस्य यांनी मोठ्या शिताफीने हा पिकअप पकडला. या पिकअप गाडीमधे एकूण १२ पाळीव गोवंशांची सुटका करण्यात आली. पिकअपचा ड्रायवर मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला.
गाडीत असलेल्या एका तरुणाला मात्र ग्रामस्थ तसेच गोराक्षकांनी पकडले. अभोणा येथून मालेगावी कत्तलीसाठी ही जनावरे नेली जात असल्याचा संशय प्राणीन फाउंडेशनच्या सदस्यांना आला होता. त्यांनी हा पिकअप चिंचवे शिवारातील सांगवी फाटा येथे पकडला.
प्राणीन फाउंडेशन गुजरात राज्य अध्यक्ष लेडी सिंगम नेहा दिदी पटेल, आद्य गोरक्षक संजय काका शर्मा, धुळे महाराष्ट्र राज्य प्राणीण फाउंडेशन सदस्य दादा माऊली, महेश भामरे, विलास जगताप, वाल्मीक महाराज शेंदाणे, संतोष भाऊ केंडले, प्रशांत देवरे, रमेश चव्हाण, मोहन शेवाळे, विशाल गवळी, उमेश गुरव, बंटी शिदे, वैभव बच्छाव, राकेश आहीरे, तुषार आहीरे, खुशाल पगारे यांनी पिकअप पकडला. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास देवळा पोलीस करीत आहेत.