म्हसरूळ परिसरात वाहनांची जाळपोळ

म्हसरूळ परिसरात वाहनांची जाळपोळ

पंचवटी | Panchavti

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या (mhasrul Police Station) हद्दीतील एका इमारतीत पार्क केलेल्या चार ते पाच वाहनांची अज्ञात लोकांनी जाळपोळ (Vehicles Burns) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल (Case Filed) केला आहे.

या बाबत कैलास सदाशिव मोहिते ( वय.४८, रा.साई पॅलेस सोसायटी, कलानगर, म्हसरूळ) यांनी तक्रार दाखल केली आहे.

मंगळवारी रात्री मोहिते नेहमीप्रमाणे झोपले असतांना मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या सोसायटीच्या समोरील नागरिकांनी तुमच्या सोसायटीच्या पार्किंगमधील वाहनांना आग लागल्याची माहिती दिली.

त्यावेळी कैलास मोहिते आणि सोसायटी मधील इतर रहिवाशांनी पार्किंगमध्ये धाव घेतली असता तेथील पार्क केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आग लागल्याचे दिसून आले. यावेळी सोसायटी मधील रहिवाशीयांनी त्वरित बोअरच्या पाण्याने आग आटोक्यात आणली. तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली.

या घटनेत सुनील गांगुर्डे याची एक्टिव्हा मोटार सायकल क्र. एम.एच.१५ .ई वाय ०१४३, संजयातीलाल सांबरे यांची एक्टिव्हा क्र. एम.एच.१५. ईवाय ६३०९, तसेच राजेंद्र गणपत खोडे यांची इको स्पोर्ट्स कार क्र. एच.एच.१५ ईएफ ४२१२ याची वाहने जाळून खाक झाली.

तसेच याच ठिकाणी पार्क केलेली इतर दोन वाहनांना आगीची झळ पोहचल्याने त्यांचे देखील नुकसान झाले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com