कडू कारल्याची गोड कथा; वांग्यानेही मारली बाजी

कडू कारल्याची गोड कथा; वांग्यानेही मारली बाजी

पिंपळगाव बसवंत | Pimpalgaon Baswant

पिंपळगाव बसवंत बाजार पेठेत भाजीपालाचे भाव कधी नव्हे या वर्षी गगनाला भिडले आहेत. कधी काळी 100 रूपयात पिशवीभर भाजीपाला मिळत असे आता केवळ शंभर रुपयांत एक किलोभर कारली मिळत आहेत. कडू कारल्यासोबतच आता भरताच्या वांग्यांनीदेखील भाव खाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे...

पिंपळगाव बसवंत येथील बाजार पेठेत भाजीपाला विक्रीला नेणे म्हणजे तोटा सहन करणे असे समीकरण शेतकऱ्यांचे झाले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून कधी नव्हे भाजीपाला घेणे आता इथे सोने घेण्यासारखेच झाले आहे.

निसर्गाचा लहरीपणा, थंडी, मध्येच अवकाळी यामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न घटले. यामुळे एकेकाळी शंभर रुपयांत पिशवीभर येणारा भाजीपाला आता मात्र थेट शंभर रुपये किलोच झाल्यामुळे भाजीपाल्याऐवजी डाळी, उसळ खाणे अनेकांनी पसंत केलेले दिसून येत आहे.

पिंपळगाव बसवंत क्रुषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटली आहे. कधी नव्हे या वेळी भाजीपालाचे भाव गगनाला भिडले असुन सर्व सामान्य माणसाला आता भाजीपाला देखील घेणे मुश्किल झाले आहे. आजही भाजीपाला दर जर बघितला तर कारले 100 रुपये प्रती किलो असे दर मिळत आहेत.

असे आहेत दर

भेंडी 120 प्रती किलो

वांगी 120 प्रती किलो

वाल 80 प्रती किलो

घेवडा 60 प्रती किलो

टाटा 25 प्रती किलो

डोबळी 80 प्रती किलो

गवार 120 प्रती किलो

कोबी 40 एक गड्डा

फ्लॉवर 35 रूपये प्रती गड्डा

हे सर्व दर पिंपळगाव बसवंत सारख्या ठिकाणचे आहेत. शहरी भागातील दर तर या पेक्षाही अधिक असू शकतात. या वर्षीच सर्व भाजीपाल्याला तेजी असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. निसर्गाचा लहरीपणा व शेतकरी वर्गाचे झालेले नुकसानीमुळे उत्पन्नात घट झाल्याने भाजीपाला येणे मुश्किल झाले असुन परीणामी भाव कधी नव्हे या वेळेस मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

संजय पुरकर, भाजीपाला, व्यावसायिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com