टॉमेटो, वांगी, ढोबळी मिरची, भावात वाढ

टॉमेटो, वांगी, ढोबळी मिरची, भावात वाढ

नाशिक । Nashik

जिल्ह्यात बहुतांशी भागात चांगला प्रमाणात पाऊस झाला असुन काही दिवसांच्या उघडीपीनंतर पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे.

अनेक भागात जादा झालेल्या पाऊसाचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे. काही भागात भाज्या खराब होत असुन यामुळे ठराविक भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने भावात चांगली सुधारणा झाली आहे.

परिणामी भाजीपाल्याची आवक वाढत असतांना भावात चांगली सुधारणा झाल्याचे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसुन येत आहे. शनिवारी (दि.6) नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याची आवक पुन्हा वाढली आहे. यात टॉमेटोसह वांगी, दोडके, ढोबळी मिरचीला चांगला भाव मिळत आहे.

मागील महिन्यात पाऊस कमी असल्याने नाशिक मार्केट कमेटीतील भाजीपाल्याची आवक कमी असल्याने भाजीपाल्यास चांगला भाव मिळाला होता.

अशीच स्थिती आता असुन जिल्ह्यात बहुतांशी भागात पुन्हा एकदा चांगला पाऊस सुरू झाल्याने याचा काही ठिकाणी भाजीपाल्यास फटका बसला आहे. टॉमेटोसह काही भाजीपाला सडु लागला असल्याने त्यांची आवक कमी झाली आहे. गेल्या काही दिवसात नाशिक मार्केट कमेटीत व नाशिकरोड येथील मार्केटच्या उपबाजारात भाजीपाला आवक वाढली.

परिणामी मुंबई व इतर राज्यात जाणार्‍या भाजीपाल्यात देखील वाढ झाली असुन मुंबई उपनगरासह इतरत्र 109 वाहने भाजीपाला रवाना झाला आहे.

शनिवारी (दि.23) रोजी झालेल्या लिलाव प्रक्रियेत वांग्याला असा 4 हजार 507रुपये (आवक 290 क्विंटल), ढोबळी मिरची 5000 रु. (आवक 294 क्विंटल), दोडका3750 रु(एकुण आवक 37 क्विंटल), गिलके 6250 रु.(एकुण आवक 66 क्विंटल), भोपळा 2000 रु.(एकुण आवक 570 क्विंटल), टमाटा 3620 रु.(एकुण आवक 4351 क्विंटल) असा भाव मिळाला.

तर फ्लॉवर 1785 रु.(एकुण आवक 322 क्विंटल), कोबी 1250 रु.(एकुण आवक 294 क्विंटल), काकडी 1750 रु.(एकुण आवक 840 क्विंटल), भेंडी 2500 रु. (आवक 24 क्विंंटल) असा भाव मिळाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com