पंचवटी | Panchavti

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक टिकून असल्याने भाव देखील स्थिर आहे.

मात्र उन्हाची तीव्रता वाढत असल्याने याचा परिणाम येत्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंबहुना मे महिन्याच्या सुरुवातीला दिसून येईल.

येत्या काही दिवसात प्रामुख्याने पालेभाज्यांची आवक कमी होऊन भाववाढ होण्याची शक्यता आहे. बाजार समितीत फळ आणि पालेभाज्यांची आवक गत महिन्याच्या तुलनेत २० ते २५ टक्यांनी घसरली आहे. याचा परिणाम किरकोळ बाजारात देखील दिसून येणार आहे.

किरकोळ बाजारात मेथी, कोथिंबीर २० ते २५ रुपये, कांदापात, शेपू १५ ते २० रुपये भावाने विक्री सुरू आहे. वांगी २० रुपये, भेंडी ५०-६०, टमाटे १०-२०, ढोबळी ३०-४०, गवार ५०-६०, काकडी ३५-४०, मिरची ५५-६०, गिलके, दोडके ५० रुपये , कोबी १५ रुपये नग, भोपळा १० रुपये भाव आहे.

बाजार समितीच्या तुलनेत किरकोळ बाजारातील या भाज्यांचे भाव किलोमागे १० ते १५ रुपयांनी जास्त आहेत.

उन्हाळ्यात साधारणपणे पालेभाज्यांची आवक कमी होऊन दरात वाढ होत असल्याने याचा विचार करता येत्या काही दिवसात पालेभाज्या आणि फळभाज्याची आवक कमी होऊन दरवाढ होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिश्याला झळ बसणार आहे.