अहो! हा कुठला बाजार नाही, भर रस्त्यात थाटलेली दुकाने आहेत
नाशिक

अहो! हा कुठला बाजार नाही, भर रस्त्यात थाटलेली दुकाने आहेत

सामाजिक अंतराचे तीनतेरा; वाहतूक कोंडी नित्याचीच

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सातपूर | प्रतिनिधी

औद्योगिक वसाहतीतील क्लब हाऊस परिसरात रस्त्यावर सुरू करण्यात आलेल्या भाजी बाजारामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

सामाजिक सुरक्षिततेचे अंतर पाळले जात नसल्याने करोना प्रसार होण्याची दाट भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. या परिसरात कारखान्यांमध्ये जाणाऱ्या कामगारांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

प्रशासनाने हा बाजार क्लब हाऊस मैदानावर भरवावा अशी मागणी कामगार व नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासनाने परिसरातील भाजीबाजार बंद केल्याने व्यवसायिक पहाटे चार ते सकाळी दहा वाजेपर्यंत क्लब हाऊस लगतच्या रस्त्याच्या कडेला भाजीबाजार मांडून बसत आहेत.

या परिसरात केवळ सातपूर भागातील भाजी व्यवसायिक नव्हे तर संगमनेर, चाळीसगाव, दरी, मातोरी, गिरणारे, त्रंबकेश्वर आदी भागातील भाजी व्यवसायिक व शेती उत्पादक आपला भाजीपाला घाऊक स्वरूपात विकण्यासाठी या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत.

परिणामी, पहाटे चार वाजेपासून हा परिसर गजबजू लागतो. रस्त्याच्या कडेला बसल्यामुळे भाजी व्यवसायिक ग्राहक, घाऊक विक्रेतेे व त्यांच्या वाहनांमुळेे परिसराची कोंडी होत आहे. प्रशासन मात्र याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने नागरिकांना या गर्दीतूनच भाजीपाला खरेदी करावे लागत आहे.

परिणामी शहरात पसरत असलेल्या महामारी चा प्रादुर्भाव व फैलाव या बाजारातून होण्याची शक्यता लक्षात घेऊन क्लब हाऊस मैदानावर भाजीबाजार खुला करण्यात यावा या विस्तीर्ण मैदानामध्ये सुरक्षित अंतराचे नियोजन करावे व प्रशासनाने या ठिकाणी जबाबदारी घेऊन बाजार भरवावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

याठिकाणी व्यवसायला येणाऱ्या भाजीविक्रेत्या मध्ये मोठ्या प्रमाणात नवखे भाजीवाले आलेले आहेत. प्रत्यक्ष बायोमेट्रिक केले आणि नोंदणी करून नियमितपणे व्यवसाय करणाऱ्या नोंदणी केलेल्या व्यावसायिकांना बसायला जागाच मिळत नाही.

नव्या व्यावसायिकांना पायबंद घालावा व प्रशासनाने नोंदणीकृत व्यवसायिकांना जागा नेमून द्याव्या इतरांना व्यवसायाची मज्जाव करावा. दत्तात्रय मोराडे भाजी व्यवसायिकांच्या

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com