ग्रामीण भागात भाजीपाला-फळांची पिकअपद्वारे विक्री

ग्रामीण भागात भाजीपाला-फळांची पिकअपद्वारे विक्री

कळवण | Kalwan

कळवण शहरात शेतकर्‍यांनी मागील वर्षी अक्षरशः फळे घरोघरी जाऊन विकली लॉकडाऊन नंतर काही शेतकरी व्यापार्‍यांवर अवलंबून न राहता स्वतः भाजीपाला व फळे विकत आहेत यंदा हीच परिस्थिती कळवण शहरात दिसून येत आहे.

टरबूज खरबूज द्राक्ष ट्रॅक्टर व पिकअप अशा वाहनातून शेतकरी विक्री करीत आहे. सुरुवातीस शेतकर्‍यांच्या मनात धाकधूक होती पण शेतमाल विकला जात आहे. हि आनंदाची बाब आहे.

पण शेतकरी द्विधा मनस्थितीत आहे. पण आता नेमकी नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोना विषाणू संकट बेमोसमी अवकाळी पाऊस असे अनेक संकटे झेलत अख्या देशाचे पोट भरणारा शेतकरी राजा आता हतबल झाला आहे.

पिकाचे सरासरी उत्पन्न घटले असून नेमके पीक कोणते घ्यावे ह्या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. तसे कळवण तालुका सधन समजला जातो मात्र मागील दोन वर्षांपासून इथला शेतकरी इकडे आड तिकडे विहीर या अवस्थेत आहे. जर अजून लॉकडाऊन वाढला परिस्थिती निवळली नाही तर काय करावे? यामुळे कळवण तालुक्यातील शेतकरी वर्ग विचार करीत असून नेमका भाजीपाला लागवड करावा कि नाही.

अजून संकटात एक भर म्हणजे पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण असून संपूर्ण कळवण तालुकाभर अवकाळी पाऊस पडला आहे अजून काही दिवस वातावरण असेच राहील असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. आता नेमके कोणते पिक करावे कि करू नये या संभ्रमात कळवण तालुक्याचा शेतकरी अडकला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com