वीर जवान जनार्दन ढोमसे यांना अखेरचा निरोप

लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
वीर जवान जनार्दन ढोमसे यांना अखेरचा निरोप

भरवसफाटा। वार्ताहर Bharvasphata

तालुक्यातील मरळगोई बु. (मूळ गाव उगाव) येथील रहिवासी व भारतीय सैन्यदलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (32) यास जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यवावर असताना वीरमरण आले.काल वीरजवान जनार्दनला शासकीय इतमामात साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. मुलगा पवनने वडिलांना मुखग्नी दिला.

दुपारी चारच्या सुमारास शहीद जवान जनार्दनचे पार्थिव मरळगोई येथे येताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. यावेळी शहीद जवान अमर रहेच्या घोषणांनी परिसर भावूक झाला होता. शहीद जवान जनार्दनचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी घरी ठेवण्यात आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर सैन्यदल व पोलिसांच्या वतीने तोफांची सलामी देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पटारे, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, लासलगावचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, डी. के. जगताप, प्रकाश पाटील, जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे, रामभाऊ जगताप आदींसह सैन्यदलातील अधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com