नाशकात वटपौर्णिमेचा उत्साह; जाणून घ्या आख्यायिका

नाशकात वटपौर्णिमेचा उत्साह; जाणून घ्या आख्यायिका

नाशिक । Nashik

शहरासह जिल्ह्यात वटपौर्णिमा (Vat poornima) उत्साहात साजरी होत असून विवाहित महिला (Married woman) आपल्या पतीच्या (Husband) दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची (Banyan tree) मनोभावे पूजा करतांना दिसत आहेत...

ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवणाऱ्या महिला (woman) सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्यलंकार परिधान करून व्रताची सुरुवात करतात. त्यानंतर वटवृक्षाची पूजा करत वडाला (Banyan) फुले, वाण, पाणी देत त्याभोवती परिक्रमा करतात.

वटपौर्णिमेची अशी आहे आख्यायिका

वट सावित्री पौर्णिमेच्या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटवृक्षाचे वय शेकडो वर्षे असते. आपल्या पतीलाही वटवृक्षाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावे आणि आपल्या कुटुंबाचा (family) आनंद वटवृक्षासारखा हिरवागार ठेवायचा असल्याने त्या हे व्रत (Vrat) पाळतात. त्याचवेळी, दुसऱ्या कथेनुसार, सावित्रीने वटाखाली बसून तपश्चर्या करून पतीचे प्राण वाचवले होते, म्हणून वट सावित्री पौर्णिमेच्या व्रताला वटवृक्षाची (वटवृक्षाचे आरोग्य फायदे) पूजा केली जाते.

त्याचबरोबर वटवृक्षाचे स्वतःचे धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्व आहे. हिंदू मान्यतेनुसार, शिव, ब्रह्मा आणि विष्णू वडामध्ये राहतात. हे झाड दीर्घकाळ हिरवे राहते आणि पर्यावरण संतुलनात (Environmental balance) विशेष योगदान देते. त्यामुळे या विशेष दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते.

वटपौर्णिमा पूजेची पद्धत

वटपौर्णिमा व्रत करणाऱ्या स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि लाल रंगाचे किंवा कोणत्याही शुभ रंगाचे कपडे परिधान करावे. सावित्री आणि सत्यवान (Savitri and Satyavan) तसेच यमाच्या मातीच्या मूर्ती वटवृक्षाखाली स्थापित कराव्या. त्यानंतर वटवृक्षाच्या मुळास पाणी अर्पण करावे. परत रोळी, दोरा, भाजलेले चणे, फुले या साहित्याने वडाची पूजा करावी. यानंतर झाडाच्या खोडाला दोरा गुंडाळत ३ प्रदक्षिणा घालाव्या. व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी सत्यवान आणि सावित्रीची कथा ऐकायला हवी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com