वासंतिक नवरात्र महोत्सवास प्रारंभ

वासंतिक नवरात्र महोत्सवास प्रारंभ

पंचवटी । प्रतिनिधी Panchvati-Nashik

श्री काळाराम मंदिर संस्थानच्या (Shri Kalaram Mandir Sansthan )वासंतिक नवरात्र महोत्सवाचे (Vasantik Navratra Festival )उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मधुकरराव भावे यांच्या हस्ते झाले. जिल्हा सत्रन्यायाधीश अभय वाघवसे अध्यक्षस्थानी होते.

मानसी पाटील यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, राष्ट्रपती पारितोषिक विजेते महेबूब सय्यद, पोलीस अधिकारी विजय गुळवे यांचा विश्वस्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

भावे यांनी आपल्या व्याख्यानात रामायण-महाभारत व गीता यांचा आधार घेत आजच्या राजकारणाविषयी भाष्य केले. रामायणातील मंत्री सुमंत यांनी ज्याप्रमाणे रामाला आरशात चंद्र दाखवून समाधान केले. तशा प्रकारचे आचरण आजच्या मंत्र्यांमध्ये पाहिजे.

पाच हजार वर्षांपूर्वीचा हा महानायक श्री प्रभू रामचंद्र आजही आपण प्रभू मानतो व त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले जीवन व्यतीत करतो, असे ते म्हणाले. ंरात्री दसककर भगिनींचा स्वरतीर्थ श्रीराम ध्यानम कार्यक्रम झाला.

Related Stories

No stories found.