सलग दुसऱ्या वर्षीही वसंत व्याख्यानमाला रद्द

सलग दुसऱ्या वर्षीही वसंत व्याख्यानमाला रद्द

नाशिक रोड | Nashik

नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँक व नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ३० ते ३५ वर्षापासून दि. ०१ मे ते १५ मे या कालावधीत वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते, परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोना ची महामारी सुरू असल्याने गेल्यावर्षी व्याख्यानमाला रद्द करण्यात आली होती.

यावर्षी सुद्धा करोनाचे नाशिक शहर व नाशिक रोड परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. परिणामी यावर्षी सुद्धा नाशिक रोड देवळाली व्यापारी बँक व नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (दि. ०१) मे पासून सुरु होणार असलेली वसंत व्याख्यानमाला रद्द करण्यात आली आहे. या वृत्ताला नाशिक रोड व्यापारी बँकेचे चेअरमन निवृत्ती अरिंगळे यांनी दुजोरा दिला आहे.

दरवर्षी सदरची वसंत व्याख्यानमाला ही पंधरा दिवस महापालिकेच्या शाळा क्रमांक एकशे पंचवीस च्या मैदानावर होत असते. यावर्षी सुद्धा व्याख्यानमाला रद्द झाल्याने श्रोत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com