<p><strong>नाशिक । Nashik</strong></p><p>नाशकात भाजपला जोरदार धक्का बसला असून भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थित दोन्ही नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. </p> .<p>काही दिवसापूर्वीच माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असताना नाशिकमध्ये राजकीय वारे वाहायला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये संजय राऊत आले असताना दोन्ही नेत्यांचा प्रवेश सोहळा झाला. दोन्ही नेत्यांवर काय जबाबदारी द्यावी, हे मुंबईत निश्चित केले जाईल, असे संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. </p>