वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या संचालक पदी नाशिकचे श्रीराम शेटे बिनविरोध

वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या संचालक पदी नाशिकचे श्रीराम शेटे बिनविरोध

ओझे | वार्ताहर Oze

ऊस संशोधन व साखर उद्योगास तांत्रिक मार्गदर्शन करणाऱ्या अंतराष्ट्रीय संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संचालक पदी कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांची बिनविरोध निवड झाली आहे...

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे (Vasant dada sugar institute Pune) या संस्थेच्या नियामक मंडळाची निवडणूक नुकतीच होत मतदार संघ क्र.1 मधून कादवा चे चेअरमन श्रीराम शेटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे महासंचालक तथा निवडणूक समिती अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी केली.

शुगर इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी श्रीराम शेटे (Shriram Shete) यांचे सहकारी साखर कारखाना उद्योगातील आदर्शवत कामकाज बघून यापूर्वी त्यांची राज्य सहकारी साखर संघाचे संचालक व उपाध्यक्षपदी संधी दिली आहे.

त्या पाठोपाठ अंतराष्ट्रीय संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट वर संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या निवडीचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ आदींनी अभिनंदन केले.

Related Stories

No stories found.