आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना

आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत ( Maharashtra University of Health Sciences ) अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे थांबू नये यासाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यास काही प्रमाणात आर्थिक स्वावलंबी बनविण्याकरीता विद्यापीठाकडून कमवा व शिका योजना तसेच महाविद्यालयांमध्ये नियमित शिक्षण घेणार्‍या गरीब,गरजु आणि हुशार विद्यार्थींनींसाठी सावित्रिबाई फुले शिष्यवृत्ती योजना याशिवाय विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात नियमित शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्याला काही गंभीर आजार झाल्यास, त्याचा अपघात झाल्यास, अपघातामुळे अपंगत्व आल्यास किंवा अपघात किंवा आजारामुळे अपमृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांच्या होणार्‍या हानीची अंशतः का होईना भरपाई व्हावी यासाठी संजीवनी विद्यार्थी सुरक्षा योजना ( Sanjeevani Vidyarthi Suraksha Yojana ) अशा विविध योजनांसाठी अर्ज मागवले जात आहे.

या योजनांसाठी विद्यापीठ संलग्नित पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागद पत्रांची पुर्तता करावी तसेच या संदर्भातील अद्ययावत माहीती नियम व अटींसाठी विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन विद्यार्थी मंडळाच्या प्रमुख संचालकांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com