मनपा वर्धापनदिनी विविध कार्यक्रम

मनपा वर्धापनदिनी विविध कार्यक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेचा येत्या 7 नोव्हेंबरला 40 वा वर्धापनदिन (NMC anniversary)संपन्न होत असून यावेळी महापालिकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते राजीव गांधी भवन येथील प्रशासन विभागात सकाळी सत्यनारायण पूजेचे आयोजन केले आहे. याच दिवशी कालिदास कलामंदिरात संध्याकाळी 6.30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आयुक्तांसह अधिकारी, कर्मचारी सहभागी होत गाणी सादर करणार आहेत.

वर्धापन दिन निमित्ताने मुख्यालय राजीव गांधी भवनसह सहा विभागीय कार्यालयाच्या इमारती आणि कालिदास नाट्यगृहावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. रविवार (दि. 6) सकाळी 10 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर मनपा अधिकारी, कर्मचार्‍यांचा क्रिकेट सामना खेळवला जाणार असून मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे देखील क्रिकेटच्या सामन्यांमध्ये सहभागी होणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com