
नाशिक | प्रतिनिधी Nashik
मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा आज बुधवारी (ता. 22) साजरा होत आहे.पहाटे पाडवा पहाट, सकाळी सर्वत्र स्वागतयांत्रा,घरोघरी गुढ्या, दुपारी मिष्टान्न भोजनाचा आनंद, सायंकाळी सातपुरला परंपरागत बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमासह भरगच्च कार्यक्रम शहरात होणार आहेत.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर केलेले कोणतेही चांगले काम किंवा खरेदी शुभ मानली जाते. या निमित्ताने सोने, वाहन, घर खरेदी केली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी विविध प्रतीकांनी ही गुढी सजवली जाईल. वसंत ऋतूला देखील सुरुवात आज पासुनच होणार आहे. यंंदा गुढी पाडव्यासाठी सकाळी 6.29 ते 7. 39 हे मुहूर्त शुभ मानले आहे. गुढीपाडव्याच्या निमीत्ताने बाजारात चैतन्य पसरले असले तरी अवकाळी पावसा मुळे त्यावर काहीसा परिणामही जाणवत आहे.
गेल्या तीन दिवसापासुन नववर्ष सवागत यांत्रा समीती तर्फे शहरात कार्यक र्र्म होत आहे.काल ‘धर्मवीर छत्रपती संंभाजी महाराज बलिदान दिन’ म्हणजेच ‘मृत्यंजय दिनानिमित्त’ तरुणांमध्ये स्वत्व जागरण करण्याच्या हेतूने ‘शिवकालीन शस्त्रविदया व त्याच बरोबर भारतीय व्यायाम पद्धती’ ज्यामध्ये सूर्यनमस्कार, चंद्र नमस्कार, भूमिवंंदन असे विविध ‘भारतीय व्यायाम आणि प्रात्याक्षिके’ सायंकाळी 6 वा. सादर केली. तसेच ‘शिवकालीन विविध प्रकारचे शस्त्रे’ आबालवृद्धांंना जवळून बघता यावी व हाताळता यावी या उद्देशाने ‘शस्त्रात्रांची प्रदर्शन’(सकाळी 9 ते रात्री 9 ेपर्यंत मांडले होते. हे प्रात्यक्षिक सव्यसाची गुरुकुलाचे लखन जाधव आणि त्यांचे विद्यार्थी यांनी दाखविले.