जिल्हयात 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत विविध उपक्रम

जागतिक शौचालय दिन
जिल्हयात 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत विविध उपक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्वच्छ भारत मिशन Swachh Bharat Mission (ग्रामीण) अंतर्गत जागतिक शौचालय दिनानिमित्त World Toilet Day जिल्हयात दि.18 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व सुशोभीकरण, शाळा व अंगणवाडींमधील शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीवर विशेष भर देऊन उपलब्ध शौचालयांचा शाश्वत वापर व होण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ZP CEO - Leena Bansod यांनी दिली.

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत शौचालयांचा नियमित वापर व्हावा, नादुरुस्त शौचालय दुरुस्त व्हावीत, गावातील व परिसराची स्वच्छता राहावी यासाठी सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनासह शाश्वत स्वच्छतेवर काम करण्यात येत आहे. दरवर्षी 19 नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

कोविड 19 च्या काळामध्ये स्वच्छतेच्या सवयी अतिशय महत्वाच्या असल्याने यावर्षी वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या नियमित वापरावर भर देण्यात आला आहे.

जागतिक शौचालय दिनानिमित्त राबविण्यात येणा-या विशेष अभियानामध्ये सार्वजनिक शौचालयांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, सार्वजनिक शीचालयांना वीज जोडणी उपलब्ध करून देणे, सार्वजनिक शौचालय परिसरात स्वच्छता करणे, कुटुंबस्तरावर शौचालयांच्या परिसराची स्वच्छता आणि सुशोभिकरण, नादुरुस्त सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, ग्रामपंचायत कार्यालयातील नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, शाळा, अंगणवाडीतील नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती यावर विशेष भर देऊन उपलब्ध शौचालयांचा शाश्वत वापर होण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चाटे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com